अशोक खरात प्रकरणात ईडी ‘ॲक्शन मोडवर’; नाशिकमध्ये १२ तास झाडाझडती, पुण्यात तीन ठिकाणी छापे

अशोक खरात प्रकरणात ईडी ‘ॲक्शन मोडवर’; नाशिकमध्ये १२ तास झाडाझडती, पुण्यात तीन ठिकाणी छापे

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय आक्रमक झाले असून नाशिक व पुण्यात सोमवारी एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. नाशिकमधील कर्मयोगी नगर परिसरातील ‘तृप्तबाला’ बंगल्यावर सुमारे १२ तास झाडाझडती घेण्यात आली, तर पुण्यात तीन ठिकाणी धाड टाकून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

ईडी आणि आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने सकाळपासून ही कारवाई सुरू केली. खरात यांच्या बेनामी मालमत्ता व आर्थिक गैरव्यवहारांबाबत कागदपत्रांची सखोल तपासणी सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, खरात यांच्याशी संबंधित ट्रस्टचे माजी विश्वस्त सीए ललित पोफळे यांच्या पुण्यातील निवासस्थानीही छापा टाकण्यात आला.

याच प्रकरणात शिर्डी परिसरातही हालचाली वाढल्या असून समता पतसंस्थेच्या राहाता शाखेची तपासणी करण्यात आली. या पतसंस्थेतील खात्यांद्वारे कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलाचा जबाब नोंदवला असून, या संपूर्ण प्रकरणात आर्थिक गैरव्यवहारांच्या धागेदोऱ्यांचा तपास विविध यंत्रणांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon