तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने हरवलेले मोबाईल परत; राबोडी पोलिसांची यशस्वी कारवाई

तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने हरवलेले मोबाईल परत; राबोडी पोलिसांची यशस्वी कारवाई

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : हरवलेल्या मोबाईल फोनच्या तक्रारींवर जलद आणि प्रभावी कारवाई करत राबोडी पोलीस स्टेशनने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने अनेक गहाळ मोबाईल शोधून काढले असून ते त्यांच्या मूळ मालकांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

सदर कारवाईदरम्यान पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईलचे लोकेशन ट्रॅक केले आणि विविध ठिकाणांहून ते हस्तगत केले. या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी राबोडी पोलिसांचे आभार मानले असून, पोलीसांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon