पुण्यात थट्टा मस्करी जीवावर बेतली, किरकोळ वादातून मित्रांचाच खून; पोलिसांकडून ४ जणांना अटक

Spread the love

पुण्यात थट्टा मस्करी जीवावर बेतली, किरकोळ वादातून मित्रांचाच खून; पोलिसांकडून ४ जणांना अटक

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – राज्याची सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरात गुन्हेगारी, खून, अवैध धंद्याचे प्रमाण वाढत आहे. नुकतेच पुण्यात एका तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून हत्या करतानाच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. पुण्यातील कॅम्प परिसरात किरकोळ वादातून मारहाण आणि हत्येचा प्रकार घडल्याची माहिती आहे. मयत आणि आरोपी हे दोघेही मित्र असून काल दोघांमध्ये कॅम्प परिसरात किरकोळ वाद झाला. त्यानंतर, दोघांमध्ये वाद झाला आणि सहा जणांनी मयत तरुणावर वार करत त्याची हत्या केली. याप्रकरणी, पोलिसांनी आत्तापर्यंत एकूण ४ आरोपींना ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.

फैसल फारुख खान असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून आरोपी शाहबाज शेख याच्यासोबत त्याचा वाद झाला होता. या किरकोळ वादानंतर दोघांमध्ये मारहाण झाली आणि शाहबाजच्या इतर काही मित्रांनी एकत्र येत फैसलला धारदार शस्त्राने मारले, त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी, बजाद अली सय्यद, अली अब्बास अश्रफअली सय्यद, सोहेल युसुफ तांबोळी, शाहबाज चांद शेख, तालिब अली सय्यद, अश्रफली सय्यद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शहबाज शेख, याची मयत फैसल खान याने थट्टा मस्करी केली, त्याचा राग आल्याने शाहबाज याने मयताच्या कानाखाली चापट मारली. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाल्याने, शहबाज शेख व त्याच्या बाकीच्या साथीदारांनी धारधार चाकुने फैसल खानच्या छातीत, पाठीत, हातावर, आणि डोक्यात वार करत त्याची हत्या केली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. त्यामध्ये, भररस्त्यात आजुबाजूला माणसं असतानाही ही मारहाणीची घटना घडत असल्याचे दिसून येते. दरम्यान, काहींनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केल्याचंही पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon