मुलीशी बोलण्यास मज्जाव केल्याचा राग; तलवार घेऊन घरात घुसून तरुणाचा धिंगाणा

मुलीशी बोलण्यास मज्जाव केल्याचा राग; तलवार घेऊन घरात घुसून तरुणाचा धिंगाणा

पोलीस महानगर नेटवर्क 

उल्हासनगर : मुलीशी बोलण्यास मनाई केल्याच्या रागातून एका तरुणाने तलवार घेऊन मुलीच्या घरात घुसून धिंगाणा घालत मारहाण केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ येथील आस्था हॉस्पिटल परिसरात नितु विरुसिंग लबाना या कुटुंबासह राहतात. त्याच परिसरात विष्णू परिहार हा तरुण राहतो. तो लबाना यांच्या मुलीशी वारंवार संपर्क साधत असल्याने नितु लबाना यांनी त्याला मुलीसोबत बोलण्यास मनाई केली होती.

या गोष्टीचा राग मनात धरून विष्णू परिहार याने रविवारी (२६ एप्रिल) दुपारी अडीचच्या सुमारास लबाना यांच्या घरात जबरदस्तीने तलवार घेऊन प्रवेश केला. त्याने घरात घुसत मुलगी तसेच तिची जेठाणी ज्योती यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

या मारहाणीत दोघीही जखमी झाल्या. तसेच “तुम लोगो को अब जिंदा छोड़ रहा हूँ, लेकिन मैं फिर से आऊंगा,” अशी धमकी देत त्याने हातातील तलवार हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली.

यानंतर आरोपीने घराबाहेर उभी असलेली दुचाकीही फोडून नुकसान केले. या प्रकारामुळे नितु लबाना या भयभीत झाल्या असून त्यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीवरून पोलिसांनी विष्णू परिहार याच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता त्याचा कसून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon