सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

पुराव्याअभावी मुंबई सत्र व दिवाणी न्यायालयाचा निर्णय

रवि निषाद / मुंबई

मुंबई : सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात आरोपीविरुद्ध ठोस व सबळ पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याने मुंबई सत्र व दिवाणी न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बेस्टचे चालक असून त्यांनी नवघर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३, ३२३ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने त्यांना मारहाण करत शिवीगाळ केली तसेच सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र सुनावणीदरम्यान आरोपीच्या वतीने अ‍ॅडव्होकेट राज कांबळे यांनी युक्तिवाद करत, आरोपीविरुद्ध मारहाणीचा कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. घटनेबाबत ड्युटी रजिस्टरमधील नोंदी किंवा वैद्यकीय तपासणीचा अहवाल यांसारखे महत्त्वाचे पुरावे पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात आले नसल्याने सरकारी पक्ष आरोप सिद्ध करू शकत नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पुराव्याअभावी आरोपीची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिला. या वेळी अ‍ॅडव्होकेट राज कांबळे यांच्यासह अ‍ॅडव्होकेट श्री. भोसले आणि पंकज धोत्रे उपस्थित होते. समाजात खोट्या गुन्ह्यांची नोंद होण्याचे प्रमाण वाढत असल्याने अशा प्रकारांना आळा बसणे गरजेचे असल्याचे मत अ‍ॅडव्होकेट कांबळे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon