ठाणे की रिक्षा’वाला कुणाला कामरासह सुषमा अंधारेही मंगळवारी विधिमंडळात दाखल

Spread the love

ठाणे की रिक्षा’वाला कुणाला कामरासह सुषमा अंधारेही मंगळवारी विधिमंडळात दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गायल्याने कॉमेडियन कुणाल कामरावर शिवसैनिक चांगलेच संतापले होते.ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंसह महाविकास आघाडी व ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही कुणाल कामराचा व्हिडिओ शेअर केला होता. याप्रकरणी, अखेर काही नेत्यांकडून हक्कभंग दाखल करण्यात आला होता.

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी कुणाल कामराच्या व्हिडिओवरुन कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध हक्कभंग दाखल करण्यात आलं आहे.जवळपास एक वर्षापूर्वी दाखल विधीमंडळातील हक्कभंग प्रकरणी आता सुनावणीला सुरुवात झाली आहे. त्याचसाठी, कुणाल कामरासह सुषमा अंधारेही मंगळवारी विधिमंडळात दाखल झाल्या.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि कॉमेडियन कुणाल कामरा यांची हक्कभंग समिती समोर सुनावणीसाठी हजेरी लावण्यात आली. मात्र,मंगळवारी सुनावणी झालीच नाही.कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे आपली बाजू समिती समोर मांडणार होते, पण ज्यांनी हक्कभंग आणला ते आमदार प्रवीण दरेकर हजर नसल्याने ही सुनावणी झाली नाही. याप्रकरणी, पुढील सुनावणी १० मार्च रोजी होणार आहे.

दरम्यान, या सुनावणीसाठी आलेल्या कॉमेडियन कुणाल कामर यांच्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांच्या टी-शर्टवर The Constitution of India असा नामोल्लेख असलेले पुस्तक छापण्यात आल्याचं दिसून आलं.मी संविधानाचा आदर करतो, मी संविधान मानतो. त्यामुळे, पुढील सुनावणीत मी माझी बाजू मांडेल अशी प्रतिक्रिया यावेळी कुणाल कामराने दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon