बॉलिवूड लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान रुग्णालयात दाखल

Spread the love

बॉलिवूड लेखक आणि सलमान खानचे वडील सलीम खान रुग्णालयात दाखल

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – सिनेसृ्ष्टीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध लेखक आणि अभिनेते सलमान खानचे वडील सलीम खान यांची अचानक तब्येत बिघडली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सलीम खान यांची तब्येत नेमकी कशामुळे बिघडली? त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान,मंगळवारी सकाळी अभिनेता सलमान खान रुग्णालयाबाहेर दिसला. सलमान खान सध्या त्याच्या आगामी बॅटल ऑफ गलवान या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. मात्र,मंगळवारी तो कडक सुरक्षेत रुग्णालयाबाहेर दिसला. रुग्णालयाबाहेरील सलमानचा व्हिडिओ समोर येताच चाहते चिंतेत पडले आहेत. सलीम खानच्या उत्तम आरोग्यासाठी चाहते सतत प्रार्थना करत आहेत.

सलमान खानचे वडील सलीम खान हे ९० वर्षांचे आहेत. खान कुटुंबाने त्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. सलमान खानने रुग्णालयाबाहेर माध्यमांशी संवाद साधला नाही. सलीम खान यांना नेमकं कोणत्या कारणास्तव रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे? याची माहिती समोर आलेली नाही. इन्स्टाग्रामवर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत सलमान खान काळ्या रंगाचा टी शर्ट घालून हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहे. कडक सुरक्षेत त्याची गाडी रुग्णालयातून बाहेर पडत असल्याचं दिसून येत आहे. अभिनेत्याच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसत आहे. तर, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये अतुल अग्निहोत्री देखील लीलावती हॉस्पिटलमध्ये जाताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी सलीम खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सलीम खान पूर्ण सुरक्षेसह समुद्रकिनाऱ्यावर फिरताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये सलीम खान यांची तब्येत बिघडलेली दिसत आहे. दरम्यान, त्यांना अचानक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पापाराझींनी सलमानला हॉस्पिटलमधून बाहेर पडताना कैद केले आहे. घटनास्थळावरील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon