महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना पद्म पुरस्कार; हेमा मालिनींनी स्वीकारला धर्मेंद्र यांचा सन्मान

महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना पद्म पुरस्कार; हेमा मालिनींनी स्वीकारला धर्मेंद्र यांचा सन्मान

योगेश पांडे / वार्ताहर

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे झालेल्या समारंभात महाराष्ट्रातील आठ मान्यवरांना विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर झाला असून, त्यांचा सन्मान पत्नी व खासदार हेमा मालिनी यांनी स्वीकारला. तर उद्योगपती उदय कोटक आणि जाहिरात क्षेत्रातील दिग्गज पियुष पांडे यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

याशिवाय सामाजिक कार्यकर्ते जनार्दन बोठे, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, प्रयोगशील शेतकरी श्रीरंग लाड, उद्योजक सत्यनारायण नुवाल, प्रा. जुझर वासी तसेच डॉ. रामचंद्र गोडबोले आणि डॉ. सुनीता गोडबोले या दाम्पत्याला ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामीण विकास, लोककला, कृषी, विज्ञान आणि आरोग्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon