महापालिकेत संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

Spread the love

महापालिकेत संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण : संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महापौर हर्षाली विजय चौधरी यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपायुक्त समीर भूमकर, सहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे व रविंद्र हमरे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून त्यांच्या कार्यास अभिवादन केले.

समाजातील समता, सेवा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या संत सेवालाल महाराजांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon