श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त ठाण्यात विद्यार्थ्यांची प्रभातफेरी; एकात्मतेचा संदेश

Spread the love

श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी वर्षानिमित्त ठाण्यात विद्यार्थ्यांची प्रभातफेरी; एकात्मतेचा संदेश

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या ३५० व्या शहीदी समर्पण वर्षानिमित्त ‘हिंद की चादर’ या उपक्रमाअंतर्गत ठाण्यात विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढत एकात्मतेचा संदेश दिला. विशाल हिंदी हायस्कूल आणि आझाद इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम रविवारी उत्साहात पार पडला.

देशभक्तीपर घोषणांनी निनादलेल्या प्रभातफेरीत विद्यार्थी, शिक्षक व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात फलक-बॅनर घेऊन विद्यार्थ्यांनी परिसरात जनजागृती करत बंधुता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला. यावेळी श्री गुरु तेग बहादूर साहिब यांच्या शौर्य, त्याग व मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी जाणीव निर्माण होत असून राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. प्रभातफेरीस स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाळांच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon