रेल्वे प्रवाशांना चाकूचा धाक; लुटीचा प्रयत्न उधळला, आरोपीला प्रवाशांकडून चोप
पोलीस महानगर नेटवर्क
अंबरनाथ : लोकल रेल्वेमधील प्रवाशांना चाकू व धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला प्रवाशांनीच पकडून चांगलाच चोप दिल्याची घटना घडली. ही घटना गर्दीच्या वेळी घडल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीने डब्यातील प्रवाशांना धमकावत पैसे व मोबाईल काढून देण्यास सांगितले. मात्र प्रवाशांनी धाडस दाखवत एकत्र येत त्याला पकडले. त्यानंतर आरोपीला मारहाण करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत धारदार शस्त्र जप्त केले असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.