नवी मुंबईत मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला

Spread the love

नवी मुंबईत मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला

योगेश पांडे / वार्ताहर

नवी मुंबई – राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी गुरुवारी मतदान प्रकिया पार पडली असून आज १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे.मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महापालिकेसाठी झालेल्या मतदानावेळी अनेक ठिकाणी राडा झाल्याचं पाहायला मिळालं, काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड दिसून आला.

बोगस मतदान आणि बोटावरील शाई पुसली जात असल्याचा मुद्दा यंदाच्या महापालिका निवडणुकीत मतदानाच्या दिवशी चांगलाच गाजला. अनेक ठिकाणी दुबार मतदारही आढळून आले.मतदान केंद्रावरील गोंधळांमध्ये नवी मुंबईतील एका मतदान केंदावर चक्क कोब्रा साप आढळून आल्याने चांगलाच गोंधळ उडाला.नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान शिरवणे येथील लक्ष्मीबाई सुतार प्राथमिक आरोग्य केंद्रातील मतदान केंद्र क्र. २१/१ मध्ये अचानक कोब्रा साप आढळल्याने एकच खळबळ उडाली.

मतदानासाठी जमलेल्या मतदारांच्या गर्दीत साप दिसताच काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, मतदारांकडून तात्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.पोलिसांनीही तात्काळ मतदारांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेत सर्पमित्रांना बोलवले, सर्पमित्रांनी कोब्रा सापाला कोणतीही इजा न करता सुखरूप पकडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon