कांदिवलीत गुंडांचा माज ! दोन गटामध्ये झालेल्या हाणामारी सोडवत आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या पोलिसांना मारहाण

Spread the love

कांदिवलीत गुंडांचा माज ! दोन गटामध्ये झालेल्या हाणामारी सोडवत आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असलेल्या पोलिसांना मारहाण

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलीस गेले. त्यावेळी गुंडांनी पोलिसांनाचीच कॉलर पकडत हुज्जत घातली. पोलीस पथकातील कर्मचाऱ्यांवरच गावगुंडांनी हल्ला केला. पोलिसांना गुंडांकडून मारहाण करण्यात आली. कांदिवलीमध्ये रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

कांदिवली पश्चिममधील एकता नगरमध्ये दोन गटामध्ये हाणामारी सुरू होती. पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक एकता नगरमध्ये पोहोचले. दोन गटातील वाद थांबवून आरोपींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतानाच काही गुंडांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला.

पोलीस अटक करण्यासाठी जात असताना काही गुंड त्यांना अडवू लागले. इतकंच नाही, तर काही पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडून त्यांना कारवाई करण्यापासून रोखण्यात आले. काही कर्मचाऱ्यांना गुंडांनी मारहाण केल्याचा संतापजनक प्रकारही घडला.

घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची माहिती मिळताच आणखी पोलीस कर्मचारी पाठवण्यात आले. एकता नगर आणि आसपासच्या परिसरामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली.

काही व्हिडीओमध्ये पोलीस आरोपींना पकडण्यासाठी जात असताना गुंड त्यांना पकडताना दिसत आहेत. काहींनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. त्यामुळे गुंडांना पोलिसांचा धाक उरलाय की नाही? असा प्रश्नही या घटनेने अधोरेखित होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon