गांजा विक्रीसाठी फिरणारे दोघे जेरबंद; ठाणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : गांजा सारख्या अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी फिरत असलेल्या दोन व्यक्तींना ठाणे ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून अटक केली असून, अमली पदार्थविरोधी मोहिमेला यामुळे मोठी गती मिळाली आहे.
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक अमोल मित्तल यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. शहापूर तालुक्यातील गोलभन गावाजवळ पोलिसांनी रचलेल्या सापळ्यातून आसिफ गणी शेख आणि विपुल कृष्णा मोरे यांना ताब्यात घेण्यात आले.
कारवाईदरम्यान ४ किलो ५२ ग्रॅम इतका गांजा जप्त करण्यात आला असून, पुढील तपास शहापूर पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.