२२.२७१ किलो गांजासह दोघांना अटक
अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोकण कृती विभागाची कारवाई
पोलीस महानगर नेटवर्क
कल्याण : कल्याण पश्चिमेत अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कोकण कृती विभागाने केलेल्या धडक कारवाईत तब्बल २२.२७१ किलो गांजा जप्त करण्यात आला असून ओडिशातील दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत अंदाजे ४ लाख ४५ हजार ४२० रुपये इतकी आहे.
बैल बाजार, वैकुंठधाम स्मशानभूमीसमोर दोन जण संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने दाखल होत त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळला. चौकशीत त्यांनी आपली नावे गिरोधारी देव्हारी आणि ईशंभूशाहू साहू अशी सांगितली.
घटनेप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२२३/२०२५ अन्वये एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क), २९(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई विशेष पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत, पोलिस उपमहानिरीक्षक प्रविण पाटील, पोलिस अधीक्षक मकानदार, अपर पोलिस अधीक्षक गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी रामचंद्र मोहिते, पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर गावशेते, सपोनि उमेश भोसले, सपोनि यू. आर. काळे, पोउपनिरीक्षक नरे, तसेच पोहवा अनिल मोरे, लिलाधर सोळंकी, मगरे, पोहा जितेंद्र कांबळे, पोहचा सतीश सरफरे, पोहवा रॉड्रीग्ज, चव्हाण, पोशि प्रमोद जमदाडे, पोशि भोईर, मपशि पादोर आणि कोल्हे यांनी ही कारवाई पार पाडली.