मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच मतदारांचा महापूर; मालाड व कुर्ल्यात मोठी लाट तर दक्षिण मुंबईत टक्का घसरला

Spread the love

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच मतदारांचा महापूर; मालाड व कुर्ल्यात मोठी लाट तर दक्षिण मुंबईत टक्का घसरला

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील घोळ अजूनही संपलेला नसल्याचे दिसते. शहरातील २२७ प्रभागातील मतदारांच्या संख्येत एकूण १२.६७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईतील काही भागात मतदारांचा महापूर आला आहे. तर काही भागात मतदारांच्या संख्येत मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. पश्चिमी आणि मध्य उपनगरांमध्ये मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तर दक्षिण मुंबईतील काही जुन्या भागात मतदारांच्या संख्येत घट आली आहे. प्रारुप मतदार यादीतून हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, २०१७ नंतर मुंबईतील मतदारांच्या संख्येत एकूण १२.६७ टक्क्यांची वाढ झाली आहे. अर्थात प्रत्येक प्रभागात यामध्ये बदल दिसला. २२७ प्रभागात वेगवेगळा ट्रेंड दिसला.

प्रारुप मतदार यादीनुसार, सर्वात मोठा बदल हा पश्चिमी उपनगरांमध्ये दिसून आला. मलाड-मालवणी या भागात आणि मध्य मुंबईच्या कुर्ला परिसरात मोठा बदल दिसला. पी नॉर्थ बेल्डच्या प्रभाग क्रमांक ४८, ३३, १६३ आणि १५७ मतदारांच्या संख्येत ५० टक्क्यांची वाढ झाली. या प्रभात मुख्यतः कामगार आणि अल्पसंख्यांक समुदायाची लोकसंख्या अधिक आहे. या नवीन मतदारांवर राजकीय पक्ष आणि प्रशासनाचे बारीक लक्ष आहे. सर्वाधिक मतदार वाढ झालेल्या टॉप-५ प्रभागातील तीन पी उत्तरी भागात आहेत.

तर दक्षिण मुंबईत चित्र मात्र उलटे आहे. जुन्या प्रभागात मतदारांच्या संख्येत मोठी घसरण दिसून आली. एकूण २४ प्रभागात मतदारांची संख्या कमी झाली आहे. यामध्ये १० उपनगरांचा पण समावेश आहे. कळबादेवी आणि चीरा बाजार येथील लोक इतर ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत. कारण या भागातील अनेक जुन्या इमारतींचा पुनर्विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे यापरिसरातील अनेक लोक बाहेर गेले आहेत.

प्रशासकीय स्तरावर मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आल्याने बोगस मतदारांची आकडेवारी समोर आली आहे. बीएमसी आणि निवडणूक आयोगाने जवळपास ११ लाख दुबार मतदारांची नावं मतदार यादीतून कमी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मतदार जोडणी, अंतर्गत स्थलांतरण आणि नवीन मतदारांची नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon