CEIR पोर्टलच्या मदतीने खंडणी विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी; १५ गहाळ मोबाईल मूळ मालकांच्या हाती परत

Spread the love

CEIR पोर्टलच्या मदतीने खंडणी विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी; १५ गहाळ मोबाईल मूळ मालकांच्या हाती परत

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे – खंडणी विरोधी पथकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत केंद्रीय दूरसंचार ओळख नोंदणी (CEIR) पोर्टलच्या साहाय्याने गहाळ झालेल्या विविध कंपन्यांचे तब्बल १५ मोबाईल फोन हस्तगत करून त्यांची एकूण ₹१,९७,५८९/- इतकी किंमत असलेली मालमत्ता मूळ मालकांना परत सुपूर्द केली आहे.

या कारवाईमुळे मोबाईल चोरी व गहाळ प्रकरणांमध्ये पोलिसांच्या तांत्रिक क्षमतेचा प्रत्यय नागरिकांना आला आहे. CEIR पोर्टलमुळे चोरीला गेलेले किंवा हरवलेले मोबाईल ट्रॅक करणे अधिक सुलभ आणि परिणामकारक झाले असून, खंडणी विरोधी पथकाने या यंत्रणेचा अचूक आणि प्रभावी वापर करत यशस्वी कामगिरी बजावली.

तत्पर कारवाई, तांत्रिक कौशल्य आणि नागरिकांच्या विश्वासात भर घालणारी ही कार्यवाही ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कामगिरीचे सकारात्मक उदाहरण ठरत आहे. मोबाईल परत मिळाल्याने संबंधित नागरिकांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले असून, अशाच पद्धतीने भविष्यातही हरवलेल्या मोबाइल संदर्भातील तक्रारींवर प्रभावी कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon