२६/११ मुंबई हल्ल्यातील शहीदांना सलामी : पोलीस आयुक्त कार्यालयात श्रद्धांजलि कार्यक्रम
सुधाकर नाडार/ मुंबई


मुंबई : २६/११ दहशतवादी हल्ल्यात वीरगती प्राप्त केलेल्या पोलीस अधिकारी, जवान आणि निरपराध नागरिकांना श्रद्धांजलि अर्पण करण्यासाठी बृहन्मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात आज अभिवादन संचलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. देशासाठी प्राणार्पण केलेल्या वीरांच्या बलिदानाची आठवण करत वातावरण द्रवित झाले.
कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा, पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन् भारती, सर्व पोलीस उपायुक्त, वरिष्ठ अधिकारी तसेच शहीदांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.
शहीदांचे छायाचित्रे समोर ठेवून पुष्पांजलि अर्पित करण्यात आली. पोलीस बँडच्या सुरावटी आणि गार्ड ऑफ ऑनरमधील सलामीने संपूर्ण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले. हल्ल्याच्या वेळी प्राणांची पर्वा न करता लढणाऱ्या शूरवीरांचे शौर्य आणि कर्तव्यनिष्ठा पुनःस्मरणात आली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहीदांचे बलिदान देशाच्या इतिहासात सदैव अजरामर राहील. मुंबई पोलीस दल शहराच्या सुरक्षेसाठी नेहमीप्रमाणेच कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.