देहूरोडच्या ‘माई बाल भवन’मध्ये हाजी अरफात शेख यांचा वाढदिवस दिव्यांग मुलांसह साजरा
रवि निषाद / वार्ताहर
पुणे – भाजपाचे दमदार आणि लोकप्रिय नेते, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष व भाजपा वाहतूक सेलचे प्रमुख हाजी अरफात शेख यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोड (पुणे) येथील माई बाळ भवन येथे २३ नोव्हेंबर रोजी दिव्यांग मुलांसह विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पुणे परिसरातील मान्यवर, वाहतूक क्षेत्रातील प्रतिनिधी, समाजसेवक आणि हजारो समर्थकांनी उपस्थित राहून शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी हाजी अरफात शेख यांचा वाढदिवस राज्यभरात सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. रक्तदान शिबिरे, अन्नदान, गरजूंसाठी साहित्य वाटप असे विविध जनउपयोगी कार्यक्रम समर्थकांनी आयोजित करून वाढदिवसाचे औचित्य साधले.
देहूरोड येथे माई बाळ भवनमध्ये दिव्यांग मुलांसाठी आयोजित कार्यक्रमात शेख यांनी मुलांना भेटवस्तू देत त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांच्या सोबत सहकारी मित्रपरिवार, विविध क्षेत्रातील उद्योजक, व्यापारी, मौलवी, वाहतूकदार तसेच नामांकित राजकीय व्यक्ती उपस्थित होत्या. कार्यक्रमस्थळी उत्साहपूर्ण आणि उत्सवमय वातावरण पाहायला मिळाले.
हाजी अरफात शेख यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत, “समर्थकांचे प्रेम आणि जनसेवेची संधी हीच माझी खरी संपत्ती आहे,” असे सांगितले. कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती त्यांच्या सचिव श्री. विनय मोरे यांनी दिली.