आंदेकर टोळीचा पुणे पोलिसांनी उतरवला माज; आंदेकरच्या तिन्ही पोरांना रस्त्यावर आणत धिंड काढली

Spread the love

आंदेकर टोळीचा पुणे पोलिसांनी उतरवला माज; आंदेकरच्या तिन्ही पोरांना रस्त्यावर आणत धिंड काढली

योगेश पांडे / वार्ताहर

पुणे – मागील काही दिवसांपासून पुणे शहरासह आसपासच्या परिसरात गँगवॉरच्या विविध घटना समोर आल्या आहेत. माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळी आक्रमक झाली आहे. मागील तीन महिन्यात आंदेकर टोळीने दोन खून केले आहेत. यात आयुष कोमकर आणि गणेश काळेचा समावेश आहे. आयुष कोमकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरचा नातू आहे. असं असूनही त्याने आपल्या नातूला संपवलं.

त्यानंतर वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी समीर काळेच्या भावाची देखील गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आंदेकर टोळीच्या या वाढत्या कारवायांमुळे त्यांची पुणे शहरासह जिल्ह्यात दहशत वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा माज उतरवला आहे. आंदेकर टोळीचे प्रमुख आधारस्तंभ असलेल्या बंडू आंदेकरच्या तिन्ही पोरांना पुणे पोलिसांनी रस्त्यावर आणलं.

पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीतील मुख्य आरोपींची भररस्त्यात धिंड काढली आहे. बंडू आंदेकरचा मुलगा आणि आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांची पुणे पोलिसांनी धिंड काढली आहे. आंदेकर टोळची प्रामुख्या गणेश पेठेत आणि नाना पेठेत दहशत आहे. याच भागात पोलिसांनी आंदेकरच्या तिन्ही पोरांची धिंड काढली आहे.

पुणे पोलिसांनी घर झडतीच्या निमित्ताने तिन्ही आरोपींना गणेश पेठेत नेलं होतं. यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींची रस्त्यावरून धिंड काढली. परिसरातील आंदेकर टोळीचा दरारा कमी करण्यासाठी ही धिंड काढल्याचं बोललं जातं आहे. मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात आक्रमक पावलं उचलली आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. मागील तीन आठवड्यात पोलिसांनी विविध ठिकाणी छापेमारी करत ११ बंदुका आणि काही जिवंत काडतुसं देखील जप्त केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon