ऑनलाईन दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश! मुंबईत विद्यार्थी अटकेत; खळबळजनक कट उघड
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील एक अभियांत्रिकीचा विद्यार्थी सुमारे सहा महिन्यांपासून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी स्लीपर सेल म्हणून काम करत होता. क्रिप्टोकरन्सीचा वापर करून पैसे गोळा करत असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मुंबईत कार्यरत असलेल्या एका मोठ्या ऑनलाइन दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात अभियांत्रिकीचा विद्यार्थी अयान शेख याला अटक करण्यात आली आहे. तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अयान सुमारे सहा महिन्यांपासून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी स्लीपर सेल म्हणून काम करत होता. त्याच्यावर तरुणांना कट्टरतावादी बनवण्याचा आणि दहशतवादी संघटनेसाठी नवीन सदस्यांची भरती करण्याचा आरोप करण्यात आला आहे. एटीएसच्या सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की अयान सतत त्याच्या वर्गमित्रांना आणि जवळच्या मित्रांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत होता. त्याने दोन विद्यार्थ्यांचे इतके ब्रेनवॉश केले की ते दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होण्यासाठी परदेशात जाण्याची तयारीत होते.
एटीएसने या दोन विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत आणि या नेटवर्कमध्ये आणखी कोण सामील असू शकते हे शोधण्याचा प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहे. तपास यंत्रणेनुसार या मोहिमेसाठी अयानला परदेशातूनही आर्थिक मदत मिळत होती. सूत्रांचे म्हणणे आहे की पाकिस्तान आणि सौदी अरेबियातून त्याला पैसे पाठवले जात होते. निधीसाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केला जात होता, त्यामुळे निधीचा वापर कोणालाही दिसून येऊ नये म्हणून क्रिप्टोकरन्सीचा वापर केला गेला.
एटीएस आता अयानच्या बँक खात्यांची, डिजिटल वॉलेट्सची आणि मनी ट्रान्सक्शनची सखोल चौकशी करत आहे जेणेकरून आतापर्यंत हस्तांतरित झालेल्या एकूण पैशांची रक्कम किती पैसे अयान चा बँक खात्यात पाठवण्यात आले. अयानच्या मोबाईल फोनच्या फॉरेन्सिक तपासणीदरम्यान एटीएसने अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केला आहेत. दहशतवादी नेते अझहर मसूद आणि मोहम्मद हाफिजशी संबंधित ऑडिओ-व्हिडिओ आणि कट्टरपंथी साहित्य सापडले.
अयान टेलिग्राम आणि इतर एन्क्रिप्टेड मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे परदेशी हँडलर्सच्या संपर्कात होता असा तपासात निष्पन्न झाले आहे. या ऑनलाइन गटांमध्ये भारतातील विविध राज्यांमधील तरुणांचा समावेश होता, जिथे कट्टरपंथी विचारसरणी पसरवण्यासाठी आणि नवीन भरती करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या.