दैनिक पोलीस महानगरची प्रतिनिधी सबिया हुसैन शेख ग्राउंड हीरोस अवॉर्ड २०२५ ने सन्मानित
रूट आँफ काईंडनेस फाउंडेशन तर्फे अभिनेत्री रेखा खान यांचा हस्ते ट्रॉफी देऊन करण्यात आले सम्मान
हुसैन शेख / प्रतिनिधी
मुंबई – सामाजिक कार्य करणाऱ्या रूट आँफ काईंडनेस फाउंडेशन तर्फे आयोजित ग्राउंड हीरोस अवॉर्ड २०२५ कार्यक्रमात स्थानिक पातळीवर काम करणारे पत्रकार हे आपले जीव हातावर ठेऊन आपल्या जिवाची काळजी ना करता समाजात होणार्या भ्रस्टाचार दाखवणारे आणि गोर गरिबांच्या आवाज बनणारे योद्धानां ग्राउंड हीरोस अवॉर्ड २०२५ देऊन सम्मानित करण्यात आले या कार्यक्रमात पोलीस महानगरची प्रतिनिधी सबिया हुसैन शेख यांना रूट आँफ काईंडनेस फाउंडेशनची अध्यक्ष श्रीमती रेश्मा खान आणि अभिनेत्री रेखा खान यांचा हस्ते ग्राउंड हिरोस अवॉर्ड २०२५ देऊन सम्मानित करण्यात आले. दैनिक पोलीस महानगर परिवारातर्फे प्रतिनिधी सबिया हुसैन शेख यांना पुढील वाटचालील हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.