कोळसेवाडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; अपहरित अल्पवयीन मुलगी सोलापुरात सुरक्षितपणे मिळाली!
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : कोळसेवाडी पोलिस ठाण्यात दाखल अपहरण प्रकरणात ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथे संशयित इसमासह अपहरित अल्पवयीन मुलगी शोधून काढली.
मुलगी सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आली असून पुढील आवश्यक कारवाई सुरू आहे.