२७ वर्षीय डॉक्टर विवाहितेला लॉजमध्ये नेत अत्याचार; आरोपीला तेलंगणातून बेड्या

Spread the love

२७ वर्षीय डॉक्टर विवाहितेला लॉजमध्ये नेत अत्याचार; आरोपीला तेलंगणातून बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर

छत्रपती संभाजीनगर – २७ वर्षीय विवाहित डॉक्टर महिलेवर हॉटेलमध्ये अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेलंगणातील तरुणासोबत महिलेची ओळख झाली होती. त्यानंतर आरोपी तरुणाने तिला हॉटेलवर बोलवत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. इतक्यावरच न थांबता आरोपी थेट डॉक्टर महिलेच्या घरापर्यंत गेला. त्यामुळे घाबरलेल्या महिलेने संपूर्ण प्रकार पतीला सांगितला. या प्रकरणी डॉक्टर महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपी विरुद्ध वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला तेलंगणातून बेड्या ठोकल्या आहेत.

सी. अमरनाथ (३८)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, काही वर्षांपूर्वी तिची इन्स्टाग्रामवरुन आरोपी सी अमरनाथ याच्यासोबत ओळख झाली होती. आरोपीने डॉक्टर महिलेचा विश्वास संपादित करुन तिला १७ जुलै २०२४ रोजी पहिल्यांदा शहरात भेटायला बोलावले.

सिडको परिसरात एका हॉटेलमध्ये चहा नाश्ता करून तो माघारी परतला. त्यानंतर पुन्हा २३ ऑगस्ट २०२४ रोजी आरोपी सी अमरनाथ हा पुन्हा शहरात आला. तेव्हा त्याने महिलेला रेल्वे स्टेशन परिसरात भेटायला बोलावले. पाऊस सुरू असल्याने दोघं हॉटेल गेले. यावेळी आरोपीने मला पैशांची गरज आहे, तुझ्या नावाने कर्ज काढून दे, काढलेले कर्ज मी स्वतः फेडेन असं सांगितलं. याचवेळी आरोपीने डॉक्टर महिलेवर हॉटेलमध्ये अत्याचार केला. अत्याचार करतानाचे फोटो व्हिडिओ देखील काढले. त्यानंतर ते फोटो तिला पाठवण्याची धमकी देत पुन्हा अत्याचार केला.

दरम्यान १८ सप्टेंबर २०२५ रोजी आरोपी सी अमरनाथ पुन्हा शहरात आला. यावेळी त्याने थेट डॉक्टर महिलेच्या घरापर्यंत येण्याची मजल केली. यामुळे घाबरलेल्या महिलेने संपूर्ण प्रकार पतीला सांगितला. डॉक्टर महिलेच्या तक्रारीवरून वेदांत नगर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तेलंगणा येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon