२४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल

Spread the love

२४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर; २ डिसेंबरला मतदान, ३ डिसेंबरला निकाल

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून मतदान २ डिसेंबर रोजी तर मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी आजपासून (४ नोव्हेंबर) आचारसंहिता लागू झाली आहे.

निवडणुकीसाठी नामनिर्देशन १० ते १७ नोव्हेंबर, छाननी १८ नोव्हेंबर, अर्ज माघारी २१ नोव्हेंबर आणि चिन्ह वाटप २६ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. ही निवडणूक ईव्हीएम यंत्राद्वारे होणार असून राज्यभरात १३ हजार कंट्रोल युनिट्स बसवण्यात आल्या आहेत.

३१ ऑक्टोबरला जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार, एकूण मतदारसंख्या १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ असून त्यापैकी ५३ लाख २२ हजार ८७० महिला मतदार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने ३२ जनजागृती मोहिमा सुरू केल्या आहेत. दिव्यांग, महिला (तान्ह्या बाळांसह) आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जाणार असून काही केंद्रे ‘गुलाबी मतदान केंद्र’ म्हणून फक्त महिला कर्मचाऱ्यांद्वारे चालवली जाणार आहेत.

विभागनिहाय निवडणुका:
कोकण – १७, नाशिक – ४९, पुणे – ६०, संभाजीनगर – ५२, अमरावती – ४५, नागपूर – ५५.

उमेदवारांच्या खर्च मर्यादा:

नगरपालिका:

अ वर्ग – अध्यक्ष: ₹१५ लाख, नगरसेवक: ₹५ लाख

ब वर्ग – अध्यक्ष: ₹११.२५ लाख, नगरसेवक: ₹३.५० लाख

क वर्ग – अध्यक्ष: ₹७.५० लाख, नगरसेवक: ₹२.५० लाख

नगरपंचायत:

अध्यक्ष: ₹६ लाख, नगरसेवक: ₹२.२५ लाख

दुबार मतदान टाळण्यासाठी नव्या अँपची निर्मिती करण्यात आली आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर डबल स्टार चिन्ह दर्शवण्यात आले असून अशा मतदारांकडून विशेष घोषणापत्र घेतले जाईल.

या निवडणुकांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नव्या सत्तासमीकरणांना सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon