दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडली; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चाहते त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशातच आता धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांच्या जवळील सूत्रांनी याबाबर बोलताना सांगितले की, काळजी करण्यासारखं काहीही नाही. आरोग्याच्या समस्यांमुळे खबरदारीचा उपाय म्हणून धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रूटीन चेकअप साठी त्यांना रूग्णालयात नेले असल्याचे समोर आले आहे.
धर्मेंद्र यांची प्रकृती याआधीही बिघडली होती. २०२३ मध्ये त्यांचा मुलगा सनी देओल त्यांना अमेरिकेला उपचारासाठी घेऊन गेला होती. वयोमानानुसार त्यांना त्रास होत असल्याचे समोर आले होते. त्यावळी धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी यांनी ते नियमित तपासणीसाठी रूग्णालयात गेले होते अशी माहिती दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.