महाएल्गार आंदोलनावर सरकार एक्शन मोडमध्ये; बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Spread the love

महाएल्गार आंदोलनावर सरकार एक्शन मोडमध्ये; बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – शेतकऱ्यांना कर्जमाफ आणि शेतमालाला हमी भाव सारख्या अन्य मागण्यांसह महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे आंदोलन उभे राहिले आहे. शेतकऱ्यांनी अमरावती ते नागपूरपर्यंत ट्रॅक्टर मार्च काढला. आंदोलनकर्त्यांनी नागपूर -हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग (एनएच-४४) आणि नागपूर -वर्धा महामार्ग देखील जाम केला . यामुळे अनेक तास वाहतूक बंद राहिली होती. आता या आंदोलना संदर्भात महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

शेतकऱ्यांचे आंदोलन करुन विदर्भात मजबूत असलेल्या भाजपाला अडचणीत आणायला निघालेल्या प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख माजी आमदार बच्चू कडू आणि अन्य लोकांवर आता एफआयआर दाखल केला आहे. नागपूरातील हिंगणघाट पोलिस ठाण्यात बच्चू कडू, माजी खासदार राजू शेट्टी सह सुमारे दोन हजार आंदोलन कर्त्यांवर केस दाखल करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांनी हायकोर्टाचे आदेश धुडकावत त्यांची अवहेलना करीत रस्त्यांवर धरणे दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या शेतकरी मोर्चाच्या नेत्यांवर विविध कलमांर्गत गुन्हे दाखल केले आहे. तसेच शेतकऱ्यांचा मोर्चाचे नेतृत्व करणारे बच्चू कडू यांनी आंदोलन समाप्तीचे घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांच्या हक्काच्या बाजूने आवाज उठवला आहे,यासाठी आपल्या विरोधात एफआयआर दाखल केल्याचे म्हटले आहे.

शेतकऱ्यांचे महाएल्गार आंदोलन समाप्त झाल्यानंतर महाराष्ट्राचे सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक्टीव्ह मोडमध्ये आली आहे. महाराष्ट्र सरकारने आश्वासन दिले आहे की ते शेतकरी नेत्यांशी चर्चा करुन ३० जूनपपर्यंत कर्जमाफीवर अंतिम निर्णय घेईल. सरकारने कर्जमाफीच्या आश्वासनानंतर हिंगणा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे.

बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. ट्रॅक्टरवरुन आलेल्या शेतकऱ्यांनी रस्ते जाम करुन टाकले होते. बच्चू कडू यांनी या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना शांत रहाण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर कोर्टाने रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिल्यानंतर बच्चू कडू यांना सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घ्यावे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon