बारामतीच्या बड्या उद्योगपतीवर बलात्काराचा गुन्हा; पुण्यात एमपीएससी करणाऱ्या तरुणीची तक्रार
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यात एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर बारामतीच्या एका नामांकित उद्योगपतीने विविध ठिकाणी पीडितेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पुणे शहरात या उद्योगपतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज कुंडलिक तुपे असे या बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या उद्योगपतीचे नाव आहे. याप्रकरणी पीडीतीने सांगितलेल्या आपबितीनुसार मनोज तुपेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
समोर आलेल्या माहितीनुसार, सन २०२१ ते १५/१०/२०२५ च्या कालावधीत ही घटना घडलीय आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादी नुसार सन २०२० मध्ये पीडीतेने आपले शिक्षण पूर्ण करून एमपीएससीची तयारी करण्याचे ठरवले आहे. यामुळे यानंतर पीडितेने पुण्यामध्ये अभ्यास करण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यासासाठी ती पुण्यात राहायला आली. याच दरम्यान २०२१ साली पीडीतेची आरोपी मनोज तुपे यांच्याशी बारामती येथे ओळख झाली.
मी मोठा बिझनेस मॅन आहे तुला व तुझ्या मैत्रिणीला चांगला जॉब लावून देतो असं म्हणत पीडितेचा मोबाईल नंबर घेतला. दोघांमध्ये सातत्याने फोनवर बोललं होत राहिलं. यानंतर मे २०२१ साली पीडीता अभ्यासासाठी पुण्यात राहायला गेली.त्यानंतर ऑगस्ट २०२१ मध्ये आरोपी तुपे याने पीडितेला जेवणासाठी बोलावून हडपसरपर्यंत सोडतो असं म्हणत गाडीतळाच्या जवळ गाडीतच मनाविरुद्ध शारीरिक संबंध केले. यानंतर देखील अनेकदा आरोपीने पुण्यातील विविध हॉटेलमध्ये घेऊन जात लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर बलात्कार केला.
ऑक्टोबर २०२२ मध्ये पीडितेचे लग्न झाले मात्र ऑगस्ट २०२३ पासून पीडीतेने नवऱ्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.यावेळी पीडिता तणावात होती,यावेळी आरोपीने संपर्क करत आपण लग्न करू,संपर्क तोडू नकोस” अस म्हणत पुन्हा पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवायला लागला.यानंतर मात्र जुलै २०२५ आरोपी पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत होता.मात्र लग्नाचा विषय काढला की, चिडून पीडितेसोबत भांडणे काढायचा. यानंतर मात्र माझे समाजात नाव आहे मला तुझ्यासोबत लग्न करता येणार नाही,असे म्हणत आरोपीने लग्नाला नकार दिला.
पीडितेने मी तुझी तक्रार करेल असं सांगितलं मात्र तुझे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने वारंवार शारीरिक संबंध ठेवले.. अनेकदा आरोपीने शारीरिक संबध ठेवून गोळ्या खायला द्यायचा, असे फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे.