दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Spread the love

दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या

योगेश पांडे / वार्ताहर 

बारामती – बारामती एमआयडीसी परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या व गुन्ह्याच्यावेळी या हत्यारांचा वापर करणाऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे. समर्थ सिद्ध मल्हारे असे या आरोपीचे नाव आहे.

भा.न्या.संहिता कलम १९४(२) अंतर्गत दुसऱ्या एका गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना बारामती तालुका पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, समर्थ मल्हारे हा इसम तलवार बाळगत आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ सुत्रे हलवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एमआयडीसी परिसरातील श्रायबर डायनामिक्स डेअरीच्या शेजारच्या परिसरात छापा टाकून मल्हारे यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तलवार घरी ठेवल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता एक तलवार आणि लोखंडी कोयता मिळून आला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध बारामती तालुका पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार, उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, अंमलदार केदारनाथ बिडवे, दादा दराडे, किशोर वीर, निलेश वाकळे, विलास खाडे, रवींद्र सोनवलकर आणि राहुल लांडगे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon