मुंबईतील काळाचौकी परिसरात रक्तरंजित थरार!
तरुणीवर हल्ला केल्यानंतर सोनु बराई नावाच्या तरुणाने स्वतःला संपवलं; जिवघेणा हल्ला झालेल्या तरुणीचा उपचारा दरम्यान मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील काळाचौकी परिसरात जिवघेणा हल्ला झालेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. उपचारादरम्यान मनीषा यादवचा मृत्यू झाला आहे. सर जे जे रुग्णालयात उपचार सुरू होते.शुक्रवारी सकाळी काळाचौकीच्या दत्ताराम लाड मार्गावर मनीषावर सोनू बरईने चाकूने हल्ला केला होता. दरम्यान, या हल्ल्यानंतर आरोपी सोनू बरईने स्वत:ला देखील संपवून घेतल्याची घटना घडली होती.
मुंबईच्या काळाचौकी परिसरात एका तरूणाने तरूणीवर जिवघेणा हल्ला करून स्वत:ला संपवून घेतल्याची घटना समोर आली आहे. या हल्यात जखमी झालेल्या तरूणीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तरुणीवर हल्ला केल्यानंतर आरोपीने स्वत:लाही मारून घेतले. या हल्यामागील नेमकं कारण काय आहे, याची चौकशी सुरू आहे. तत्काळ काळाचौकी पोलिस घटनास्थळी पोहोचले.
नरसिंग होममध्ये तरुणीवर हा जीवघेणा हल्ला झाला.हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली होती. स्थानिकांच्या मदतीने टॅक्सीने तरुणीला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान, तरुणीचा मृत्यू झला आहे. स्वतःचा जीव वाचवायला तरुणीने नर्सिंग होमचा सहारा घेतला होता. प्रेमप्रकरणातून या २४ वर्षीय तरुणीवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. तरुणीवर हल्ला केल्यानंतर सोनु बराई नावाच्या तरुणाने स्वतःला संपवलं आहे. ८ ते १० दिवसांपूर्वी दोघांचा ब्रेकअप झाला होता.शुक्रवारी सकाळी दोघे पुन्हा भेटले यावेळी सोनू बरई नावाच्या तरुणाने सोबत आणलेल्या चाकूने तरुणीवर हल्ला केला, स्वतःचा जीव वाचवायला तरुणीने नर्सिंग होमचा आसरा घेतला होता मात्र तिथे देखील आरोपी घुसला आणि तरुणीवर चाकूने सपासप वार केल्याची माहिती आहे. घटनास्थळ रक्ताने माखलेलं दिसून येत होतं. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती.