कोनगाव पोलिसांचे यश! वाहनचोराला अटक, ₹२.९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी : कोनगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने जलद आणि नियोजनबद्ध कारवाई करत मालेगाव, नाशिक परिसरातून वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक चोरीस गेलेली ऑटो रिक्षा आणि बर्गमेन मोटरसायकल असा एकूण ₹२.९० लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाआड केले. या कारवाईमुळे परिसरातील वाहन चोरीच्या मालकांना दिलासा मिळाला असून पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.