महिलेला बाईकवर लिफ्ट दिल्या नंतर झुडपात नेऊन अत्याचार; १०० हून अधिक सीसीटीवी तपासून पोलीसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये एका महिलेवर अत्याचार झाल्याची संतापजनक प्रकार उघडकीस आलाय. १० सप्टेंबर रोजी रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास धक्कादायक घटना घडली होती. महिलेला बाईकवर लिफ्ट देण्याचा बहाणा करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर नराधमाने महिलेवर अत्याचार केला होता. जाक्या चव्हाण असं अटक केलेल्या आरोपीचे नाव असून भिगवण पोलिसांनी त्याला अटक केलीय. आरोपी दौंड तालुक्यातील माळवाडी लिंगाळी येथील रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने १० सप्टेंबर रोजी एका महिलेला दुचाकीवरून लिफ्ट देण्याचा बहाणा केला.त्यानंतर मळद गावतील रेल्वे ब्रिजजवळ गेल्यानंतर दुचाकी थांबवली. आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देत झाडाझुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर पोलिसांची सहा पथके आरोपीचा शोध घेत होती. शंभरहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज आणि खबऱ्यांच्या मदतीनं संशयित आरोपी जाक्या कोंडक्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं. दरम्यान,आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून महिला पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल,अपर पोलीस अधीक्षक रमेश बोपडे,गणेश बिरादार उपविभागीय पोलीस अधिकारी मा.डॉ सुदर्शन राठोड,बापूराव दडस पाटील,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे,दौंड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम,पोलीस अंमलदार सुभाष राऊत,नितीन बोराडे,अमीर शेख तसेच भिगवण पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील,पोलीस अंमलदार महेश उगले, सचिन पवार,संतोष मखरे,कुलदीप संपकाळ सहा पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या पथकाने ही धडक कारवाई करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.