धाराशिवमध्ये खळबळजनक प्रकार, एकाच घरात हिंदू, मुस्लिमसह विविध जातीचे ३७ मतदार; शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गंभीर आरोप

Spread the love

धाराशिवमध्ये खळबळजनक प्रकार, एकाच घरात हिंदू, मुस्लिमसह विविध जातीचे ३७ मतदार; शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर गंभीर आरोप

योगेश पांडे / वार्ताहर 

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील परांडा नगरपरिषदेत बोगस मतदार नोंदणीचा एक गंभीर आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका घराच्या पत्त्यावर तब्बल ३७ वेगवेगळ्या जाती-धर्माच्या मतदारांची नोंदणी करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे स्थानिक राजकीय आणि

प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

परांडा नगरपरिषद क्षेत्रातील एका घराच्या पत्त्यावर हिंदू, मुस्लिम, दलित, माळी, ब्राह्मण अशा विविध जाती-धर्मांच्या ३७ व्यक्तींची मतदार म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर यामध्ये उत्तर प्रदेशातून आलेल्या पाच मजुरांचाही समावेश असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ज्या घराचा हा पत्ता वापरण्यात आला आहे, ते घर शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचे असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अरबाज पठाण यांनी केलाय.

या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, स्थानिक नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. आता या प्रकरणात काय कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील मतदार यादीतील अनियमितता आणि घोळांबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही यावर आवाज उठवला होता. त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये बोगस नोंदणी आणि निवडणूक प्रक्रिया प्रभावित करण्याचा आरोप केला होता. महाविकास आघाडी आणि मनसेकडून देखील याविरोधात निवडणूक आयोगाकडे निवेदने देण्यात आली आहेत. काही भागांमध्ये एका कुटुंबाच्या नावावर शेकडो मतदारांची नोंद दाखवण्यात आली होती, याचे पुरावेही आयोगापुढे सादर करण्यात आले होते. यावर निवडणूक आयोगातील अधिकारी निरुत्तर झाल्याचेही दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त चोक्कलिंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मतदारयादींच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. एकाच मतदारसंघामध्ये या महिलेचे दोन ठिकाणी नावे कशी आली, याबाबत चौकशी केली जाईल. यामध्ये जे अधिकारी दोषी आढळतील, त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon