खोपोली पोलिसांचे उत्तम यश! CEIR प्रणालीद्वारे ३.६९ लाख किंमतीचे २२ हरवलेले मोबाईल मालकांना परत
पोलीस महानगर नेटवर्क
खोपोली : खोपोली पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेल्या २२ मोबाईल फोनचा शोध CEIR (Central Equipment Identity Register) या आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या मोबाईलची एकूण किंमत तब्बल ₹३,६९,३०० असून, हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
या कार्यवाहीत खोपोली पोलिसांनी हरवलेले मोबाईल शोधून काढण्यासाठी केलेले परिश्रम आणि तांत्रिक कौशल्य कौतुकास्पद असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. CEIR या प्रणालीद्वारे हरवलेले मोबाईल शोधण्याचे प्रमाण वाढले असून, पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.