भिशीच्या माध्यमातून नागरिकांची ३ कोटिंची फसवडणूक करणाऱ्या पती-पत्नीच्या सोलापुर स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या
योगेश पांडे / वार्ताहर
सोलापुर – सोलापुरातून एका दाम्पत्याचा कारनामा समोर आला आहे. हे पती-पत्नी एकत्रितपणे लोकांची लूट करीत होते. त्यांनी आतापर्यंत कोट्यवधींची फसवणूक केली आहे. गेल्या वर्षभरापासून ते दोघेही फरार होते. अखेर त्यांना तामिळनाडूतून अटक करण्यात आली आहे.
सोलापुरात भिशीच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या पती-पत्नी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. भिशीच्या माध्यमातून नागरिकांना ३ कोटींची फसवणूक केल्याचं पती-पतिविरोधात तक्रार करण्यात आली. दोघेही गेल्या वर्षभरापासून फरार होते. आंध्रप्रदेश येथे गेल्या वर्षभरापासून लपून बसले होते. त्यांना १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. श्री ओम साई फायनान्सचा मालक रमेश अंबादास चिप्पा आणि पत्नी सुजाता रमेश चिप्पा यांनी २०२० ते २०२४ दरम्यान भिशी चालवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
श्री ओम साईनाथच्या माध्यमातून जवळपास १३१ ठेवीदारांकडून दोन कोटी ६९ लाख १९ हजार रुपयांची आमिष दाखवून ठेवी ठेवल्या होत्या. या पती-पत्नीने फायनान्समध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवलं होतं. मात्र त्यानंतर पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवाजी लक्ष्मण पवार यांच्यासह १३१ जणांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे.