भिवंडी गुन्हे शाखेची मोठी कारवाई; सराईत गुन्हेगारांना अटक, ९ घरफोडी व मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा!
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी – ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे केलेल्या कारवाईत भिवंडी परिसरातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीला अटक करून घरफोडी आणि मोबाईल चोरीचे एकूण ९ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
परिमंडळ २, भिवंडी परिसरात नोंद झालेल्या गृहभेदन आणि मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची चौकशी गुन्हे शाखेकडून सुरू होती. दरम्यान, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पाच आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.
गुन्हे शाखा, युनिट-२, भिवंडीच्या पथकाने अटक केलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत,
१. जुनैद अहमद मोहम्मद हनीफ शाह (२०, गायत्रीनगर, भिवंडी)
२. मोहम्मद आकिब मकबूल खान (२२, गायत्रीनगर, भिवंडी)
३. हमजा सुजूद अहमद सिद्दीकी (२०, गायत्रीनगर, भिवंडी)
४. शाहरुख इमरान अन्सारी (२१, शांतिनगर, भिवंडी)
५. शाकिर साजिद शेख (२२, न्यू गौतमनगर, गोवंडी, मुंबई)
तपासादरम्यान आरोपींकडून दोन दुचाकी, सात मोबाईल, चार वायर बंडल, सोन्याचे दागिने आणि रु. ३,१२,४२३/- इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये नारपोली, शांतिनगर, निजामपूरा आणि भिवंडी शहर पोलिस ठाण्यांतील विविध गुन्हे क्रमांकांचा समावेश असून, एकूण ९ गुन्ह्यांचा छडा लागला आहे.
ही यशस्वी कारवाई अति. पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. अमरसिंह जाधव, तसेच पोलीस निरीक्षक शेखर बागडे (गुन्हे शाखा, युनिट-२, भिवंडी) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, श्रीराज माळी, मिथुन भोईर, रवींद्र पाटील, रामचंद्र जाधव, प्रशांत राणे, नीलेश बोरसे, सुदेश घाग, सुनील सालुंके, सुधाकर चौधरी, साबिर शेख, रंगनाथ पाटील, किशोर थोरात, राजेश गावडे, प्रकाश पाटिल, शशिकांत यादव, वसंत चौरे, अमोल इंगळे, भावेश घरात, विजय कुंभार, सरफराज तडवी आणि माया डोंगरे यांनी सक्रिय सहभाग घेतला.
या कारवाईमुळे भिवंडीतील घरफोडी आणि मोबाईल चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार असून, गुन्हे शाखेच्या दक्ष आणि तडफदार कार्याची सर्वत्र प्रशंसा होत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व जनसंपर्क अधिकारी,
पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर शैलेश साळवी यांनी सांगितले.