डोंबिवलीत दिवाळी स्टॉलवरून महिलांमध्ये राडा; विष्णुनगर पोलिसांकडून दखल
पोलीस महानगर नेटवर्क
डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रोडवर दिवाळीच्या स्टॉल लावण्यावरून महिलांमध्ये जोरदार राडा उफाळून आला. घटनास्थळी परप्रांतीय फेरीवाल्या महिला आणि श्री वल्ली फाउंडेशनच्या मराठी महिलांमध्ये वाद झाला, तर काही महिलांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून भर रस्त्यात जोरदार तमाशा घालण्याचा प्रयत्न केला.
माहिती नुसार, श्री वल्ली फाउंडेशनच्या मराठी महिलांना महापालिकेकडून दिवाळी निमित्त स्टॉल लावण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, स्टॉलसाठी मंडप टाकण्याच्या वेळी परप्रांतीय फेरीवाल्या महिलांनी जागेवरून हटण्यास नकार दिला आणि वाद वाढला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यावर काही महिलांनी हिंसक हावभाव दाखवले.
घटनेची माहिती मिळताच केडीएमसी आणि विष्णू नगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.
सध्या या घटनेची अधिक तपासणी पोलिस करत आहेत आणि घटनास्थळावरून परिस्थिती शांत झाली आहे.