१४ वर्षांनंतर फरार आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक; आर. ए. किडवाई मार्ग पोलिसांचे यश!
मुंबई – तब्बल १४ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अखेर आर. ए. किडवाई मार्ग पोलिसांनी उत्तर प्रदेशमधून अटक करून मोठे यश मिळवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा नोंद क्र. ३५/२०११ कलम ३२४, ३२३, ४२७, ४५२, ३४ भादंवि अंतर्गत दाखल प्रकरणातील आरोपी शशिकुमार मातबर यादव (वय ३२, त्यावेळीचा पत्ता – ८/१७ ठोकरशी झोपडपट्टी, चायना मिल समोर, शिवडी, मुंबई-१५) हा सन २०११ पासून फरार होता.
या प्रकरणात न्यायालयीन खटला क्र. १९५/पीडब्ल्यू/२०११ दादर-शिवडी येथील मा. १३ वे प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू असताना आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्याने त्याच्याविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.
दरम्यान, आरोपीचा ठावठिकाणा गेल्या अनेक वर्षांपासून लागलेला नव्हता. शिवडी परिसरात केलेल्या शोधमोहीमेतही त्याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नव्हती. मात्र, अलीकडेच पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी उत्तर प्रदेशात लपल्याचे संकेत मिळाले. त्या अनुषंगाने विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली.
या पथकाने उत्तर प्रदेशात गुप्तरीत्या शोध मोहीम राबवून आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, मा. सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त (मध्य विभाग) श्री. विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ श्रीमती रागसुधा आर., सह पोलीस आयुक्त माटुंगा विभाग श्री. सचिन कदम, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पो.उपनि. पालवी जाधव, पो.उपनि. महागवकर, सहा. फौ. सुरेश कडलग, पो.ह. माळवे आणि पो.शि. राठोड यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.