रत्नागिरी पोलिसांची तत्पर कारवाई; हरवलेले सोन्याचे मंगळसूत्र मालकिणीकडे परत
पोलीस महानगर नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरी पोलीस दलाच्या प्रामाणिक आणि तत्पर कारवाईमुळे एका महिलेचे हरवलेले सोन्याचे मंगळसूत्र सुरक्षित परत मिळाले आहे.
दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी सौ. रसिका महेंद्र ठीक, रा. चव्हाणवाडी, राजापूर या रत्नागिरी ते राजापूर प्रवास करीत असताना त्यांची बॅग हरवली होती. या बॅगेत सोन्याचे मंगळसूत्र असल्याने त्यांना मोठा धक्का बसला होता.
लांजा पोलीस पथकाने या घटनेची गंभीर दखल घेत शोधमोहीम हाती घेतली. अखेर प्रवासी जालिंदर शेटके, रा. आंबा यांच्या प्रामाणिकपणामुळे बॅग व मंगळसूत्र सापडून ती पोलिसांच्या माध्यमातून सौ. ठीक यांच्याकडे परत करण्यात आली.