गोरेगाव पश्चिमेत अंमली पदार्थ विरोधी कारवाई : ४२७ ग्रॅम एम.डी. जप्त, किंमत ₹१.०६ कोटी; २ तस्कर अटकेत
मुंबई – बृहन्मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत गोरेगाव (प.) परिसरात मोठी कारवाई करण्यात आली.
२९ सप्टेंबर रोजी कांदिवली युनिटच्या पथकाने गस्तीदरम्यान दोन संशयित इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीदरम्यान ४२७ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. जप्त मालाची किंमत अंदाजे ₹१.०६ कोटी इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास कांदिवली युनिटकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे) श्री. लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, उप आयुक्त (अंमली पदार्थ विरोधी कक्ष) श्री. नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील कांदिवली युनिटच्या पथकाने ही कामगिरी बजावली. बृहन्मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, “अंमली पदार्थ मुक्त समाजासाठी आमची कारवाई सतत सुरू राहील.”