ताटातूट झालेल्या मायलेकाची पुनर्भेट; पोलिसांच्या तत्परतेने मुलगा आईकडे सुखरूप
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – मुंबादेवी परिसरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त झालेल्या गर्दीत ७ वर्षीय मुलगा आईपासून चुकामुक झाला. मुलगा रडत असल्याचे पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या लक्षात ही बाब आली. पोलिसांनी त्याची विचारपूस करून लगेच माईकद्वारे मुलगा हरवल्याची घोषणा केली. घोषणा ऐकताच त्याची आई धावत त्या ठिकाणी पोहोचली. पोलिसांनी खात्री करून मुलाला सुरक्षितपणे आईकडे सुपूर्त केले.