बंडगार्डन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगार पिस्तुलासह जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – बंडगार्डन पोलिसांनी गुन्हे प्रतिबंधक कारवाईदरम्यान एक मोठी कारवाई करत सराईत गुन्हेगाराला देशी बनावटीच्या पिस्तुलासह अटक केली आहे. पोलिसांच्या दक्षतेमुळे गंभीर घटना टळली असून परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापासून बचाव झाला आहे.
मालधक्का रोड परिसरात गस्तीदरम्यान पोलिसांना एक संशयित युवक थांबलेला दिसला. त्याची झडती घेतल्यावर त्याच्याकडे देशी बनावटीचे मॅग्झिनसह पिस्तुल आढळले. त्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले. सदर आरोपीचे नाव देव दिनेश परमार (वय २३, रा. दिघी चाक टीक भारत तरुण मंडळ दुर्गानगर जवळ, भवानी माटेक, पुणे). असून त्याच्याकडून देशी बनावटी पिस्तुल व मॅग्झिन जप्त करण्यात आले.
या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गु.र.नं. २००/२०२४, भादंवि कलम ३(४), शस्त्रास्त्र कायदा कलम ३(२), २५ प्रमाणे गुन्हा नोंदवला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री. राजेंद्र वसंतसिंग पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २ श्री. मिलिंद मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त, लष्कर विभाग श्रीमती अंजली आत्माराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तसेच कारवाईत पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पवार, श्रीपत राऊत, पो.उप.निरीक्षक हिरण गुत्ता, मोहन काळे तसेच पोलीस अंमलदार सारंग साळुंखे, प्रवीण गायकवाड, गणेश बडे, मनिष सपकाळ, मनोज भोके, शिवाजी सरकर, राजू ढुलुळे आदींचा समावेश होता. पोलिसांच्या वेळीच दाखवलेल्या सतर्कतेमुळे गंभीर गुन्हा रोखण्यात यश आले असून या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.