निझामपूरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; १.५० लाख किंमतीच्या ५ चोरीच्या दुचाक्या जप्त, आरोपीला अटक
पोलीस महानगर नेटवर्क
भिवंडी – शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी निझामपूरा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एकूण सुमारे १,५०,०००/- रुपये किंमतीच्या ५ चोरीच्या दुचाक्या जप्त करण्यात यश मिळवले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून पोलिस दलाचे कौतुक केले जात आहे. निझामपूरा पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यास मोठा हातभार लागणार आहे.
चोरीच्या वाढत्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच शंका आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.