ठाण्यातील नळपाडा एसआरए प्रकल्पाविरोधात नागरिकांचा रोष; जितेंद्र आव्हाड यांचा आंदोलनाचा इशारा
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – माजीवाडा नळपाडा येथील एसआरए प्रकल्पावर नागरिकांचा विरोध सुरु आहे. विकासक निवडल्यामुळे ५० वर्षांपासून येथे राहणारे नागरिक संतप्त झाले असून बायोमेट्रिक सर्व्हे थांबवण्याची मागणी करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नागरिकांच्या बाजूने उभे राहून एसआरए अधिकारी संदीप माळवी यांना कठोर इशारा दिला. आव्हाड म्हणाले की, स्थानिकांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय बायोमेट्रिक सर्व्हे होऊ शकणार नाही.
स्थानीय नागरिकांनी “एसआरएने थोपवलेला विकासक नको, आमचा विकास आम्हीच करू” असे सांगितले असून, आव्हाड यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे प्रकल्पाभोवती राजकीय आणि प्रशासनिक ताप निर्माण झाला आहे.