“स्वच्छता ही सेवा 2025” मोहिमेत कापुरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वृक्षारोपण व स्वच्छता उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

“स्वच्छता ही सेवा 2025” मोहिमेत कापुरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वृक्षारोपण व स्वच्छता उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस महानगर नेटवर्क

ठाणे : “स्वच्छता ही सेवा २०२५ – एक दिन, एक घंटा, एक साथ” या राष्ट्रीय मोहिमे अंतर्गत कापुरबावडी पोलीस ठाणे हद्दीतील आशापुरा मंदिर, जामा मस्जिद, फातिमा चर्च व सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालय परिसर येथे वृक्षारोपण व स्वच्छता उपक्रम शांततेत व यशस्वीरीत्या पार पडला.

या उपक्रमात ठाणे महापालिका आयुक्त श्री. सौरभ राव, माननीय खासदार व आमदार, पोलीस अधिकारी, धार्मिक नेते, शालेय विद्यार्थी, स्वच्छता विभागाचे कर्मचारी तसेच २०० ते २५० नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

स्वच्छ, सुंदर व हरित ठाण्यासाठी सर्वांचा एकत्रित सहभाग हीच खरी ताकद असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon