घरातून बेपत्ता झालेली १९ वर्षीय जानवी खोपडे सुखरूप सापडली
पोलीस महानगर नेटवर्क
ठाणे : कोपरी परिसरातून बेपत्ता झालेली १९ वर्षीय जानवी खोपडे हिचा तांत्रिक तपासाच्या मदतीने शोध घेण्यात पोलिसांना यश आले. तपासादरम्यान ती नायगाव, मीरा-भाईंदर परिसरात सापडली.
कोपरी पोलिसांनी जानवीला सुरक्षितपणे तिच्या वडिलांच्या ताब्यात सुपूर्द केले असून, वेळेवर केलेल्या या कारवाईबद्दल स्थानिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.