कोपरी पोलीसांकडून हरवलेले मोबाईल शोधून तक्रारदारांना परत
ठाणे – कोपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हरवलेले दोन मोबाईल फोन तांत्रिक तपासाद्वारे शोधून काढण्यात कोपरी पोलिसांना यश आले आहे.
मपोशी कदम यांनी केलेल्या तपासातून Realme व Redmi कंपनीचे दोन वेगवेगळे मोबाईल शोधण्यात आले. हे मोबाईल वपोनि श्री. विश्वकार यांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले.
या प्रशंसनीय कार्यामुळे तक्रारदारांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून, कोपरी पोलिसांच्या कार्याचे परिसरात कौतुक होत आहे.