पाठलाग करून तरुणीचा जबरदस्तीने किस; खडक पोलिसांकडून तरुणाविरुद्ध गुन्हा

Spread the love

पाठलाग करून तरुणीचा जबरदस्तीने किस; खडक पोलिसांकडून तरुणाविरुद्ध गुन्हा

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे : तरुणीचा वारंवार पाठलाग करून तिच्या इच्छेविरुद्ध जवळीक साधत जबरदस्तीने किस केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात इमाम इब्राहिम इनामदार (वय २०, रा. ग्रीन पार्क, कोंढवा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ७४, ७८, ७९, ३५१ आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून २०२५ पासून आरोपी संबंधित तरुणीचा सतत पाठलाग करत होता. ३ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास आरोपी तिच्या घराजवळ आला. “सोबत चल” असे म्हणत त्याने तिला जबरदस्तीने जवळ ओढले आणि तिच्या इच्छेविरुद्ध किस केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकारामुळे तरुणीच्या मनात भीती व लज्जा निर्माण झाली. त्यानंतर आरोपीने अश्लील शिवीगाळ करत तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon