अंजुर खाडीतील गावठी दारूभट्ट्यांवर नारपोली पोलिसांचा धडक छापा; ४० लाखांचा मुद्देमाल नष्ट

Spread the love

अंजुर खाडीतील गावठी दारूभट्ट्यांवर नारपोली पोलिसांचा धडक छापा; ४० लाखांचा मुद्देमाल नष्ट

पोलीस महानगर नेटवर्क

भिवंडी – नारपोली पोलिसांनी अंजुर खाडीच्या बेटावर मोठी कारवाई करत अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी दारू निर्मितीच्या हातभट्ट्यांवर धडक छापा टाकला. या कारवाईत तब्बल ₹४०,२२,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.

अवैध दारू निर्मितीमुळे समाजामध्ये गुन्हेगारीला चालना मिळत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी मोठ्या प्रमाणात तयार गावठी दारू, कच्चा माल व भट्ट्यांचे साहित्य उद्ध्वस्त करण्यात आले.

नारपोली पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध दारूव्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon