शांतिनगर पोलिसांचा डंका! १० किलो गांजा जप्त, आरोपी अटकेत
भिवंडी – शांतिनगर पोलीसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी १० किलो गांजा साठवणूक करत असल्याच्या आरोपीला ताब्यात घेतले असून, त्यांच्या तत्परतेला आणि दक्षतेला नागरिकांकडून कौतुक होत आहे.
ही कारवाई अंमली पदार्थविरोधी मोहिमेच्या यशस्वितेकडे मोठा टप्पा ठरली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून, गुन्ह्यात सहभागी इतर व्यक्तींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत.